महाराष्ट्रराजनीति

Maharashtra News कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवावी- चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा

रिपोर्टर वहाबअली सैय्यद,चंद्रपूर, महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशस्वी कारकीर्द आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहीती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व आयोजित करण्यात आले असल्याची माहीती आ. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा यांनी दिली. माझा बुथ सर्वात मजबूत हा मंत्र घेवून बुथ प्रमुखांनी योजनांचा जागर करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या सिंदेवाही तालुक्यातील बुथ सक्षमीकरण अभियान अंतर्गत भाजपा तालुका सिंदेवाही च्या वतीने शक्ति केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ता संमेलन सोमेश्वर महाराज मंदिर परिसरात नुसते संपन्न. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम मन की बात ही आयोजित केले होते.
याबैठक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र हे होते. हा कार्यक्रम चंद्रपूर गडचिरोली लोकसभा क्षैत्राचे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. अतुल देशकर, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरकर, नागराज गेडाम माजी जिल्हा परिषद सभापती, प्रा.गोपीचंद गणवीर, शेख गुरुज, माजी पंचायत समिती सदस्य रणधीर दुपारे,रितेश अलमस्त आदी मंचावर विराजमान होते


प्रारंभी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोंगळे यांनी बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करताना आपले बूथ मजबूत करणे बुथ हा पक्षाचा कणा आहे. त्यामुळे बुथ मजबूत करण्यावर भर द्यावा. त्यात सर्व जाती-धर्माचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा तालुक्यातील बूथ प्रमुखांनी शक्ती केंद्र् म्हणून उपस्थित राहण्याचे आहवान केले. तर बैठकीत खासदार अशोक नेते यांनी पक्षाला जिंकण्याकरीता ५१% मतांची आवश्यकता आहे त्या दृष्टीने सर्वांनी कार्य करावे असे आहवान कार्यकर्त्याना केले. चंद्रशेखर बावनकुळे हे पुढे म्हणाले कि केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजनांची माहीती नागरीकांपर्यंत पोहचावी म्हणून सोशल मिडियाचाही वापर करावा. एकीकडे मोदी सरकारची यशस्वी कारकीर्द आणि दुसरीकडे आघाडी सरकाचे अपयश जनतेपुढे मांडण्याची ही मोठी संधी आहे. कोव्हीड संकटानंतर इतर देशांची परिस्थिती पाहीली तर आपला भारत देश पुन्हा आत्मनिर्भरतेने वाटचाल करीत आहे याचे सर्व श्रेय केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयात असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढत आहे. संघटनात्मक मजबूतीसाठी महत्वपूर्ण आहेत. सर्व बुथ प्रमुखांनी माझा बुथ सर्वात मजबूत हा मंत्र घेवून काम करण्याचे आवाहन आ. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र यांनी केले.  संचालन देवेंद्र मंडलवार यांनी केले तर प्रास्ताविक कमलाकर सिद्धमशेट्टीवर यांनी केले. याप्रसंगी आशिष चिंतलवार, जाहिदखॉं पठाण, अरविंद देवतळे,नगरसेवक किशोर भरडकर, नगरसेविका अपूर्वा चिंतलवार, भारतीय जनता पार्टी तालुका सिंदेवाहीचे भाजपा सर्व फंडचे पदाधिकारी कार्यकर्ता गण उपस्थित होते.

Indian Crime News

Indian Crime News

Related Articles

Back to top button