ब्रेकिंग न्यूज़

शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक प्राथमिक केंद्राची अत्यंत धक्कादायक व संतप्त जनक प्रकार समोर आला आहे

शिरपूर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या अत्यंत धक्कादायक व संतप्त जनक प्रकार समोर आला आहे, ज्या ठिकाणी महिला गरोदर प्रस्तुतीसाठी सुरक्षित उपचार मिळायला हवेत त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दरवाजेच बंद आहेत. एका गरीब महिलेला रस्त्यावरच प्रस्तुती करण्याची वेळ आली आहे. ही घटना आहे शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक प्राथमिक केंद्राची, तालुक्यातील मोखळ येथील वाड्यावर राहणारे ठेलारी कुटुंबातील एक गर्भवती महिला ७ मार्च रोजी सकाळी सुमारे 6:00 वाजता या आरोग्य केंद्रात आली होती, मात्र धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य केंद्रातील सर्व दरवाजे बंद होते, आणि आत एकही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता, महिलेसोबत आलेले नातेवाईकांनी बराच वेळ दरवाजासमोर उभे राहून आवाज दिला, पण कोणाचाही प्रतिसाद न मिळालामुळे उपचाराविनाच त्यांना माघारी घेऊन जावे लागले, दरम्यान परत जात असताना बस स्थानकाजवळ महिलेच्या प्रस्तुती वेदना अचानक वाढल्या जिल्हा परिषद शाळेजवळील टपऱ्याच्या आडोशाला प्रस्तुती करावी लागली हा प्रकार पाहून स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली चहा विक्रेता संजय राजपूत यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला फोनद्वारे संपर्क साधून बोलावले, त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे प्रस्तुतीत महिलेला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आरोग्य केंद्रात आणल्या नंतर देखील बऱ्याच वेळ कोणत्याच उपचार झाला नाही, आरोग्य केंद्रात राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना शासकीय क्वार्टर (खोल्या )असले तरी एकही कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने हे केंद्र राम बोरसे चालत असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केले विशेषता या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत, तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत का. असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एकीकडे विकासाच्या घोषणा आणि आधुनिक आरोग्य सुविधांची दावे, मल्टी स्पेशलिस्ट दवाखान्याच्या उद्घाटनाची तयारी आणि दुसरीकडे ढासळलेली आरोग्य व्यवस्था गरीब आदिवासी महिलेला रस्त्यावर प्रस्तुती करावी लागणे हे अत्यंत लज्जास्पद व अमानवी घटना आहे. या घटनेत जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून सखोल चौकशीची मागणी आता नागरिकांकडून जोड धरत आहे आमदारांनी फक्त संताप व्यक्त न करता कायदेशीर कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी होत असून प्रगत शिरपुराला लागलेला काळा डाग आरोग्य प्रशासन कसे पुसणार हे आता हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button