ब्रेकिंग न्यूज़

*खांडबारा रेल्वे स्थानकावर तरुणाचा जीवघेणा स्टंट; डब्यावर चढून हायव्होल्टेज तारांजवळ धिंगाणा, काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प*

*खांडबारा रेल्वे स्थानकावर तरुणाचा जीवघेणा स्टंट; डब्यावर चढून हायव्होल्टेज तारांजवळ धिंगाणा, काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प* नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणाने थेट उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यावर चढून हायव्होल्टेज ओव्हरहेड वायरजवळ धिंगाणा घातल्याने स्थानकावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. माहितीनुसार, रात्री सुमारे दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास भुसावळ–सुरत मार्गावरील खांडबारा स्थानकात उभी असलेल्या पॅसेंजर गाडीच्या डब्यावर एक तरुण अचानक चढला. डब्याच्या छतावर पोहोचल्यानंतर त्याने धावपळ व आरडाओरडा करत अजब हालचाली करण्यास सुरुवात केली. यावेळी तो रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या सुमारे २५ हजार व्होल्ट क्षमतेच्या जिवंत ओव्हरहेड वायरच्या अत्यंत जवळ गेल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य अपघात टाळण्यासाठी खबरदारी म्हणून संबंधित मार्गावरील विद्युत पुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला शांत करण्याचा आणि खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे अर्धा ते एक तास चाललेल्या प्रयत्नांनंतर अखेर त्या तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button