ब्रेकिंग न्यूज़

रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामावरील परप्रांतीय कामगारांना जेवणातून विषबाधा.*

*रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामावरील परप्रांतीय कामगारांना जेवणातून विषबाधा.* शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामावरील ११ परप्रांतीय कामगारांना मेसमधील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अचानक पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सर्व कामगारांना पहाटे थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून दुपारी त्यांना घरी सोडण्यात आले. शिरपूर–थाळनेर–होळनांथे या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी संबंधित कंपनीने थाळनेर येथे डेपो उभारला असून येथे इतर राज्यांतील मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. गुरुवारी (५ मार्च) रोजी रात्री डेपोवरील मेसमधून पोळी, भाजी व भात असे जेवण घेतल्यानंतर काही वेळातच काही कामगारांच्या पोटात तीव्र दुखू लागले. त्यानंतर उलट्या सुरू झाल्याने कामगारांची प्रकृती बिघडली. परिस्थिती गंभीर होताच पहाटे सुमारे चारच्या सुमारास सर्व कामगारांना तातडीने थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दीपक कुमार (२८), रामभजन यादव (२४), धीरेंद्र यादव (२३), सहदेव बुद्धे (३५), प्रवेश यादव (२३), लाल बच्चन (५८), रोहित कुमार (२२), सम्राटकुमार (२८), रमणकुमार (२७), संदीपकुमार पटेल (३०), विकास गुप्ता (२२) व विनोद कुमार (३६) यांचा समावेश होता. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. गुलाबराव पाटील यांनी तातडीने उपचार केल्याने सर्वांची प्रकृती स्थिर झाली. उपचारानंतर दुपारी सर्व कामगारांना रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान, घटनेबाबत कंपनीचे प्रतिनिधी धनंजय महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, “घटनेनंतर संबंधित मेस चालकाला कामावरून हटविण्यात आले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button