ब्रेकिंग न्यूज़

*​शहादा शहरातील ​डोंगरगाव चौफुलीवर पुन्हा वाहतुकीचा खोळंबा:

*नंदुरबार जिल्यातील तालुका ​शहादा शहरातील डोंगरगाव चौफुलीवर पुन्हा वाहतुकीचा खोळंबा: पोलिसांच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल, कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी* डोंगरगाव चौफुली महामार्गावर वाहनांचा ‘महासैलाब’; रुग्णवाहिकेसह दहावीचे विद्यार्थीही अडकले! डोंगरगाव चौफुलीवर वाहतुकीचा खोळंबा; कायमस्वरूपी पोलिसांच्या नियुक्तीची मागणी.. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीचा थरार पाहायला मिळाला. डोंगरगाव चौफुली येथील भगवान बिरसा मुंडा स्मारक आणि भाऊ तात्या पेट्रोल पंपाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे, या कोंडीत गंगोत्री फाउंडेशनची रुग्णवाहिका आणि दहावीच्या परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ अचानक वाढली. बिरसा मुंडा चौकात दोन्ही बाजूंकडून वाहने समोरासमोर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. बघता बघता याठिकाणी वाहनांचा जणू महासागरच लोटला होता. गंभीर बाब म्हणजे रुग्णवाहिका या गर्दीत काही काळ अडकून पडली होती. सायरन वाजवूनही रस्ता मिळत नव्हता . सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने अनेक विद्यार्थी केंद्रावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, या 'चक्काजाम'मुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. घटनेची माहिती मिळताच ४ ते ५ वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. पोलिसांनी प्रसंगावधान राखून सर्वात आधी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला आणि त्यानंतर हळूहळू वाहतूक प्रवाहित केली. या महामार्गावर अवजड वाहनांमुळे दररोजच कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.याठिकाणी कायमस्वरूपी पोलिसांच्या नियुक्तीची मागणी जोर धरू लागली आहे."हा महामार्ग आहे की जामचा महासागर?" असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button