शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक समस्यांची बैठक संपन्न
*शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक समस्यांची बैठक संपन्नशिक्षक आमदार किशोर दराडे यांचा नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक समस्यांची बैठक संपन्न
*
आज दिनांक 21 जानेवारी 2026 बुधवार रोजी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या चारही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , कनिष्ठ प्राध्यापक यांच्या समस्यांविषयी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे शिक्षण उपसंचालक श्री राठोड साहेब सहाय्यक श्री देवरे साहेब नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक तसेच शिक्षक नेते श्री एस डी भिरूड सर श्री संभाजी आप्पा पाटील , श्री संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खालील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली यामध्ये शालार्थ ड्रॉप , वैद्यकीय बिले , अनुकंप मान्यता , वैयक्तिक मान्यता , मुख्याध्यापक मान्यता , उपमुख्याध्यापक मान्यता पर्यवेक्षक मान्यता ,कनिष्ठ महाविद्यालयीन थकीत वेतनबाबत, स्वयंअर्थशाळा प्रस्ताव ,वाढीव तुकडी ,अतिरिक्त समायोजन, इयत्ता दहावी व बारावीच्या केंद्राच्या फेरमान्यता बाबतची चर्चा त्याचबरोबर विविध शैक्षणिक समस्यांविषयी सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी शिक्षकेतर संघटना नाशिक विभागीय कार्यवाह डी पी महाले प्रा सुनील गरुड , प्रा शैलेश राणे , ,संदीप डोलारे, डिगंबर पाटील ,, एस के पाटील , गोपाळ महाजन , राजू महाजन , अमित मराठे जयेश वाणी सय्यद इसरार उदय महाजन. विलास सोनार इत्यादी उपस्थित होते आमदार किशोर दराडे यांनी प्रलंबित समस्या शिक्षण उपसंचालक श्री राठोड साहेबांसमोर मांडून दोन महिन्याच्या कालावधीत हे सारे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच दिनांक 04 .02 .2026 रोजी धुळे येथे 10 वाजता दुपारी 3 वाजता नंदुरबार दिनांक 05 02 2026 रोजी जळगाव जिल्ह्यासाठी तक्रार निवारण सभा आयोजित केली आहे

Subscribe to my channel