दलित मुलीच्या विनयभंग प्रकरणी सखोल चौकशी करावी विषयी उपविभाग पोलीस अधिकारी यांना समाज बांधवांचे निवेदन सादर
Alpमहाराष्ट्र नंदुरबार जिल्हा शहादा शहर येथील खाजगी कोचिंग क्लास संचालकावर अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप, कठोर कारवाईची मागणीअल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप, कठोर कारवाईची मागणी
शहादा (ता. शहादा) : येथील एका खाजगी कोचिंग क्लासच्या संचालकावर अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आंबेडकरवादी व पुरोगामी समाज संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, प्रवक्ता अकॅडमी या कोचिंग क्लासचा संचालक योगेश अरुण शेंडे याने हेतूपुरस्सर विद्यार्थिनीला कोणी नसताना क्लासमध्ये बोलावून तिचा विनयभंग केला. याबाबत विद्यार्थिनीने आपल्या पालकांसह जाब विचारला असता, जातिवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ह
पीडित कुटुंबावर मानसिक दडपण टाकले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली तसेच ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीकडून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची चर्चा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनांनी या प्रकरणात आरोपीला जामीन देऊ नये, जलदगती न्यायालयात खटला चालवून तात्काळ न्याय द्यावा, तसेच आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासोबतच आरोपी चालवत असलेल्या कोचिंग क्लासची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करावी, खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावेत आणि संचालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करूनच परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पोलिसांना निपक्षपाती व कठोर तपासाचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहादा शहरात संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.



Subscribe to my channel