महाराष्ट्रराज्य

Maharashtra News कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनेलला विजय करा

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र

प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्याची हीच नामी संधी-प्रा. अतुल भाऊ देशकर वहाबअली सैय्यद,चंद्रपूर, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 28 एप्रिल 2023 ला रोज शुक्रवारला होऊ घातली आहे. या अनुषंगाने शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारात गांगलवाडी येथे मतदारांची सभा माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मा. दिपक भाऊ उराडे, वासूभाऊ सौंदरकर,प्रा.प्रकाश बगमारे, प्राचार्य अरुण शेंडे, डॉ.प्रा. अशोक सालोटकर, डॉ. गोकुल बालपांडे, एड. संजय ठाकरे, संजय बगमारे, रामलाल दोनाडकर, तनय देशकर यांचे सह शेतकरी परिवर्तन पैनलचे सर्व उमेदवार तसेच मतदार बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मतदारांनी जागृत होऊन शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराच्या नवासमोर रबरी फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर म्हणाले की, खूप झाली यांची मक्तेदारी, आता शेतकरीराजा जागा झाला आहे. चांगल्या वाईटाची परीक्षा करण्याची धमक मतदारांमध्ये आहे.प्रस्तापीत अशा भ्रमात आहेत की, कृषी उत्पन्न बाजार समिती आमचे कुरण आहे.आम्ही कितीही चरलो तरी आम्हचे कोणी काहीही बिघडू शकत नाही. आता यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. कार्यक्रमाची प्रास्ताविक आणि संचालन रामलाल दोनाडकर यांनी केले तर आभार प्रा.यशवंत आंबोरकर यांनी मानले

.

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button