ब्रेकिंग न्यूज़

Maharashtra धामोरी परिसरात वादळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून म्हशीचा मृत्यू, झाड कोसळून गाईचा मृत्यू

रिपोर्टर अमोल नंदू छत्रपति महाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरात आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडल्या असून शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धामोरीजवळील मायगाव देवी येथे राहणारे सुभाष कोंडाजी जाधव यांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने त्यांच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला. अचानक कडकडाटासह झालेल्या विजेच्या प्रहारामुळे ही घटना घडली. या घटनेमुळे जाधव कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
तर दुसरी घटना धामोरी गावातच घडली. येथे प्रकाश बळवंत कांबळे यांच्या गोठ्याजवळील लिंबाचे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले. झाड थेट गोठ्यावर पडल्याने आत बांधलेल्या गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदरची माहिती मिळतात धामोरी गावचे पोलीस पाटील संगीता विजयराव ताजणे यांनी घटनास्थळी पहाणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना खबर दिली आहे

Indian Crime News

Related Articles

Back to top button