ब्रेकिंग न्यूज़

प्रकाशा जवळील डामरखेडा येथील नवीन पुलाचे काम रखडले; कमकुवत जुन्या पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

प्रकाशा जवळील डामरखेडा येथील नवीन पुलाचे काम रखडले; कमकुवत जुन्या पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!


शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील गोमाई नदीवरील नवीन पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नवीन पूल वेळेत पूर्ण होत नसल्याने जुन्या पुलावर भार वाढत असून, हा जुना पूल आता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
लोखंडी कमानी ठरतायत डोकेदुखी
जुना पूल कमकुवत झाल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यावर लोखंडी अँगलच्या ‘हाईट बॅरियर्स’ (उंची प्रतिबंधक कमान) बसवल्या आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी चालकांना या कमानीचा अंदाज येत नाही. संबंधित प्रशासनाने त्याला तसे रेडियम इतर दर्शक मोठ्या आकाराचे नसल्याकारणाने अंदाज येत नाही, यामुळे अनेकदा उंच वाहने या कमानीला धडकतात, परिणामी लोखंडी कमान वाकून खाली पडते आणि वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
एसटी बसचा ‘वळणदार’ आणि ‘जीवघेणा’ प्रवास
पुलाच्या या परिस्थितीमुळे एसटी महामंडळाच्या बसला आपला मार्ग बदलावा लागला आहे. सध्या बस लांबोळा-धुरखेडा-प्रकाशा किंवा लोणखेडा काथर्दा -प्रकाशा अशा लांबच्या आणि वळणदार मार्गाने धावत आहेत. यामुळे:
* प्रवाशांचा वेळ वाया व अधिकचा दुप्पटचे भाडे द्यावे लागत आहे. त्याचबरोबर एसटी महामार्ग वाहन देखील खराब होत आहेत,
* खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्या

त घालून हा प्रवास सुरू आहे.
* पर्यायी मार्गावरही वाहतुकीचा ताण वाढला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा
या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी माननीय मिताली सेठी मॅडम यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. नवीन पुलाचे काम का रखडले आहे? यावर प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात संवाद साधला असला, तरी प्रत्यक्ष कामाला वेग आलेला नसल्याने नागरिकांमधील असंतोष कायम आहे.
> नागरिकांची मागणी:
> “प्रशासनाने तातडीने नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. जुना पूल कधीही खराब होऊ शकतो, अशा स्थितीत केवळ लोखंडी कमानी लावून प्रश्न सुटणार नाही. जीवितहानी होण्याची वाट न बघता तातडीने उपाययोजना कराव्यात.” असे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button