जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये भरदिवसा दुचाकीची चोरी; सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद
जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये भरदिवसा दुचाकीची चोरी; सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद
भडगाव (जळगाव): शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून, भरदिवसा दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. लीलावती हॉस्पिटल आणि अंबिका कृषी केंद्रासमोरून अज्ञात चोरट्याने ‘बजाज प्लेटिना’ दुचाकी लंपास केली असून, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील मुख्य रस्त्यावर काल दिनांक 18 मार्च ला सायंकाळी ५:११ वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. MH-19 AS-0442 क्रमांकाची बजाज प्लेटिना दुचाकी मालकाने लीलावती हॉस्पिटलसमोर पार्क केली होती. मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणी मोठी रहदारी असते, मात्र चोरट्याने गर्दीचा फायदा घेत शिताफीने ही दुचाकी लावले जागेपासून बसून ढकलत पुढे घेऊन गेला व नंतर तिला स्टार्ट केली तिथून पसार झाला .
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
ज्या ठिकाणी ही चोरी झाली, त्या समोरील दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे. त्यात एक अज्ञात व्यक्ती दुचाकी नेताना स्पष्टपणे दिसत आहे. दुचाकी मालकाने तात्काळ भडगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन या घटनेची रितसर नोंद केली आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.
नागरिकांना मदतीचे आवाहन
दुचाकी मालकाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर क्रमांकाची दुचाकी कोणाला दिसून आल्यास किंवा कोणाबाबत संशय असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
* विकी पाटील बोदर्डे: संपर्क (1)९०२२८२०२९४
* संपर्क (२): ७७७६८१६६६७
> टिप: शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत आणि हँडल लॉकसोबतच अतिरिक्त सुरक्षेचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Subscribe to my channel