*शिरपूर तालुका पोलिसांची अमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई.*
*शिरपूर तालुका पोलिसांची अमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई.*
शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर छापा कारवाई करत तब्बल ३७,४५,९६५ किमतीचा २२४.६९९ किलो गांजा, व डोडा (अफू) चा साठा जप्त केला आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या या बेकायदेशीर आम्लिपदार्थ साठवून ठेवणाऱ्यांचा पर्दाफाश झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(दि. १८ मार्च) रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ लगत पळासनेर परिसरातील काही हॉटेल व ढाब्यांवर अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री सुरू आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत त्यांनी वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे) यांना कळवून छापा टाकण्याची परवानगी घेतली.
त्यानंतर छापा कारवाई पुर्वीची सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या चार टिम तयार केल्या. दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर व सर्व पोलीस स्टाफसह ११:३० वाजता बातमीप्रमाणे छापा कारवाई केली त्यामध्ये जय बाबारी हॉटेल मध्ये भल्ला सोडा भरवाड, जय मातादी ढाबा अॅण्ड रेस्टॉरंट मध्ये गोपाळ रघु भरवाड व रामदेव बाबा हॉटेल मध्ये लाला गांगु भरवाड सर्व (रा. चारणपाडा, पळासनेर ता. शिरपूर जि. धुळे) यांच्या ताब्यातून ३७,४५,९६५ रुपये किमतीचा व २२४.६९९ कि.ग्रॅ. वजनाचा मानवी मेंदूवर विपरीत परीणाम करणारा सुका गांजा, डोडा (अफुची पावडर) मिळुन आले.
याबाबत पोहेकॉ शेखर बागुल यांनी दिलेल्या फिर्यादि वरुन शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन वरील तीनही आरोपीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हयाचा तपास पोसई सुनिल वसावे करीत आहेत.
ही कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक धुळे, सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग, जयपाल हिरे पोलीस निरीक्षक, सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक, मनोज कचरे पोलीस उपनिरीक्षक, मिलिंद पवार पोलीस उपनिरीक्षक, शेखर बागुल, राजू ढिसले, संदीप ठाकरे, सुनील पाठक, अनिल चौधरी, कृष्णा पावरा, दिनकर पवार, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे, बडगुजर, शिवाजी वसावे, जयेश मोरे, अल्ताफ मिर्झा इसार फारुकी यांनी मिळून कारवाई केली.



Subscribe to my channel