ब्रेकिंग न्यूज़

सारंगखेडा जवळ ट्रॅक्टरवरून पडून ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू; हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद

सारंगखेडा जवळ ट्रॅक्टरवरून पडून ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू; हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद

शहादा-दोंडाईचा रस्त्यावर सारंगखेडा नजीक आज दुपारी एक भीषण अपघात घडला. सावळदा येथून ऊसतोड आटोपून आपल्या गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऊसतोड मजुरांना घेऊन एक ट्रॅक्टर सावळदा येथून धोंडाईचाच्या दिशेने जात होते. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास सारंगखेडा परिसरात ट्रॅक्टर आले असता, रस्त्यावरील गतिरोधकामुळे (ब्रेकर) चालकाने अचानक ब्रेक लावला. यावेळी ट्रॅक्टर चालकाच्या शेजारी बसलेला मजूर आपला तोल सांभाळू शकला नाही आणि अचानक खाली पडला. दुर्दैवाने, मजुराच्या अंगावरून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची धाव आणि रुग्णवाहिका पाचारण

अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. परंतु, मजुराचा मृत्यू झाल्याने मृतदेह १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने पुढील कार्यवाहीसाठी हलवण्यात आला आहे.

तपास सुरू

मृत मजुराची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. भररस्त्यात घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सारंगखेडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button