ब्रेकिंग न्यूज़

शहादा येथे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ‘शांतता समिती’ची बैठक संपन्न; प्रशासनाकडून सोयीसुविधांचे आश्वासन

शहादा येथे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ‘शांतता समिती’ची बैठक संपन्न; प्रशासनाकडून सोयीसुविधांचे आश्वासन

शहादा:आगामी काळात येत असलेले रमजान ईद,गुढीपाडवा, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती यांसारखे विविध धर्मीय सण उत्साहात आणि शांततेत पार पडावेत, यासाठी शहादा येथे दिनांक 16 मार्च रोजी 5 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा येथे ‘शांतता समिती’ची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत सणांच्या काळात उद्भवणाऱ्या अडचणी आणि नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला नगरपालिकेचे मुख्याधिकारी (CO) साजिद पिंजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, MSEB चे इंजिनिअर पाटील साहेब, एडवोकेट गिरासे साहेब, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरी समस्यांवर चर्चा आणि उपाययोजना:

बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी विविध प्रश्न मांडले. यात प्रामुख्याने खाटीक कब्रस्तान जवळील कचरा व्यवस्थापन, रस्त्यावर थांबलेल्या ट्रकची तात्पुरती दुसरीकडे सोय करणे, आणि वॉर्ड क्रमांक १ मधील रस्त्यांची जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्ती करणे या विषयांवर चर्चा झाली. तसेच, सणासुदीच्या काळात स्ट्रीट लाईटची समस्या उद्भवू नये आणि तांत्रिक बिघाड झाल्यास मेसेज मिळताच ‘व्हिजीटिंग’ टीमद्वारे तात्काळ दुरुस्ती करावी, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली.

प्रशासकीय भूमिका:

मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी नगरपालिकेशी संबंधित सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या अत्यावश्यक सेवा प्राधान्याने पुरवल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. “कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता, शहानिशा करूनच पाऊल उचलावे. काही अडचण असल्यास नागरिकांनी थेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, कायदा हातात घेऊ नये,” असे त्यांनी बजावले.

पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी सांगितले की, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे. सर्व सण शांततेत पार पडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Indian Crime News

Related Articles

Back to top button