शिरपूर: तापी पुलावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; वरुड गावावर शोककळा
शिरपूर: तापी पुलावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; वरुड गावावर शोककळा
शिरपूर: तापी पुलावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; वरुड गावावर शोककळा
शिरपूर (धुळे): शिरपूर तालुक्यातील वरुड येथील एका २९ वर्षीय तरुणाने गिधाडे गावाजवळील तापी नदीच्या पुलावरून उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश दिलीप कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोळी हा आपल्या कुटुंबासह वरुड (ता. शिरपूर) येथे वास्तव्यास होता. शुक्रवारी, १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तो आपल्या पल्सर मोटरसायकलने (क्रमांक MH 18 CK 1242) गिधाडे गावाच्या दिशेने गेला होता.तेव्हा आपला मोठा भाऊ दुर्गेश (व्यवसाय: प्लंबर) याला फोन केला. “मला नवीन सिम कार्ड घ्यायचं आहे , त्यासाठी थोड्या पैशांची गरज आहे,” असे त्याने फोनवर सांगितले. त्यावर दुर्गेशने “मी सध्या कामावर आहे, सायंकाळी घरी आल्यावर तुला पैसे देतो,” असे सांगितले.. त्यानंतर महेश हा गितळाजवळील तापी पुलावर गेलो व आपली गाडी उभी करून त्या गाडीवर त्याचा मोबाईल ठेवून त्याने तापी नदीत उडी टाकली व आपलं जीवन संपलं घटनास्थळी गर्दी झाली व ओळख पटवण्याचे काम सुरू झाले तेव्हा काही तासानंतरच
कुटुंबियांना बसला धक्का
भावाशी बोलणे झाल्यानंतर काही वेळातच, म्हणजे साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान दुर्गेशला एका अनोळखी फोनवरून माहिती मिळाली की, महेशने तापी पुलावरून उडी मारली आहे. ही बातमी समजताच कुटुंबाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
उपचारादरम्यान मृत्यू
नदीतून बाहेर काढल्यानंतर महेशला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वरुड गावात शोककळा पसरली आहे.

Subscribe to my channel