ब्रेकिंग न्यूज़

शहाद्यातून ३९ वर्षीय इसम बेपत्ता; शोध घेण्याचे पत्नीचे आवाहन..

शहाद्यातून ३९ वर्षीय इसम बेपत्ता; शोध घेण्याचे पत्नीचे आवाहन

शहादा (प्रतिनिधी): धडगाव तालुक्यातील कुपरखेत येथील एक ३९ वर्षीय इसम शहादा येथून अचानक बेपत्ता झाल्याची घटना ११ मार्च रोजी घडली आहे. बराच शोध घेऊनही पती न सापडल्याने अखेर पत्नीने शहादा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली असून, प्रसारमाध्यमांद्वारे मदतीचे आवाहन केले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ओरसिंग रंनज्या वळी (वय ३९), राहणार कुपरखेत, ता. धडगाव, जि. नंदुरबार हे आपल्या पत्नीसह ११ मार्च रोजी कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी निघाले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते शहादा बस स्थानकातून शहादा-नाशिक बसमध्ये बसले.

मात्र, बस शहादा शहराच्या बाहेर पडताच, मां चामुंडा खेतेश्वर हॉटेल आणि बालाजी रेसिडेन्सीच्या परिसरात ओरसिंग यांनी अचानक आरडा ओरड करू लागला “आम्हाला गावाला जायचे नाही, बस थांबवा” असे सांगितले. बस थांबल्यानंतर पती-पत्नी दोघेही खाली उतरले. खाली उतरताच ओरसिंग हे पत्नीला काहीही न बोलता जवळच असलेल्या पपईच्या शेतात हातातील बॅग घेऊन निघून गेले.

शोध घेऊनही थांगपत्ता नाही

पत्नीने परिसरातील शेतात आणि आजूबाजूला बराच शोध घेतला, मात्र ओरसिंग यांचा कोठेही पत्ता लागला नाही. नातेवाईकांकडे विचारपूस करूनही माहिती न मिळाल्याने अखेर त्यांची पत्नी सायलीबाई यांनी शहादा पोलीस स्टेशन गाठून पती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन

सदर वर्णनाचा किंवा फोटोतील व्यक्ती कोणालाही आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या कुटुंबाला8468995531 या नंबरावर माहिती द्यावी, अशी कळकळीची विनंती सायलीबाई यांनी केली आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button