दहावीचे बोर्डाचे पेपर सहावीच्या दोन विद्यार्थिनीकडून तपासून घेतानाचा धक्कादायक प्रकार व्हायरल
दहावीचे बोर्डाचे पेपर सहावीच्या दोन विद्यार्थिनीकडून तपासून घेतानाचा धक्कादायक प्रकार व्हायरल ; फलटणमधील व्हिडिओ फलटण (सातारा): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे संपूर्ण भवितव्य या परीक्षेच्या निकालावर अवलंबून असते. मात्र, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडनी येथील एका खासगी शाळेतून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.की सध्या दहावी बोर्ड चे परीक्षा झालेले विषयांची उत्तर पत्रिका संबंधित शिक्षकाकडे तपासण्यासाठी त्या त्या शाळेपर्यंत पोच झाल्या आहेत. दहावीच्या बोर्डाचे अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाचे असलेले पेपर( उत्तरपत्रिका ) एक शिक्षक चक्क सहावीत शिकणाऱ्या दोन लहान मुलीकडून तपासून घेत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नेमका प्रकार असा की, मिळालेल्या माहितीनुसार, विडनी येथील एका खासगी शाळेतील शिक्षकाकडे दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका त्या त्या विषयी शिक्षकांची नेमणूक करून तपासण्याचे काम सोपवण्यात आले होते. नियमानुसार, बोर्डाचे पेपर तपासताना अत्यंत गोपनीयता पाळणे आणि शिक्षकाने स्वतः उत्तरपत्रिकांचे सूक्ष्म निरीक्षण करून गुणदान करणे बंधनकारक असते. अध्ययन करून उरलेल्या फावल्या वेळात पेपर ( उत्तरपत्रिका ) शिक्षक अध्यक्ष काम करत असल्यामुळे त्यांना तपासण्याचे मानधन देखील दिले जात असते मात्र, या शिक्षकाने बोर्डाच्या कामाचे गांभीर्य धाब्यावर बसवून, कोणत्याही भीतीशिवाय हे पेपर वर्गातच दोन सहावीच्या मुलीच्या हाती दिले. ते शिक्षक त्या मुलीकडून पेपर चेक करून घेत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. पालकांमध्ये संतापाची लाट दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वर्षभर मेहनत करून विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, अशा बेजबाबदार शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. "जर लहान मुले बोर्डाचे पेपर तपासणार असतील, तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय?" असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे. बोर्डाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष या प्रकारामुळे परीक्षा मंडळाच्या कार्यपद्धतीवर आणि उत्तरपत्रिकांच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित व्हिडिओ पुरावा म्हणून समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभाग या दोषी शिक्षकावर काय कारवाई करणार, याकडे सर्व परीक्षार्थी आणि पालकांचे डोळे लागले आहेत. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शाळेवर आणि शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.