ब्रेकिंग न्यूज़

भडगाव तालुक्यातील बात्सर येथे अंगणवाडीच्या खाऊत आढळले किडे;

भडगाव तालुक्यातील बात्सर येथे अंगणवाडीच्या खाऊत आढळले किडे; संतप्त पालकांचा पंचायत समितीवर धडकून चौकशीचा तगादा भडगाव, तालुकयातील बात्सर येथील अंगणवाडीत बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात (खाऊ) दोन दिवसांपूर्वी किडे (बुंगे व धनुरे) आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतप्त पालकांनी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना जाब विचारत लेखी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बात्सर येथील अंगणवाडीत शासनाकडून पुरवला जाणारा आहार बालकांना वितरित करण्यात आला होता. मात्र, या आहारात मोठ्या प्रमाणात किडे आणि धनुरे असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार समजताच पालकांनी तातडीने अंगणवाडी गाठून संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे? पालकांनी जेव्हा या अस्वच्छ अन्नाबाबत विचारणा केली, तेव्हा अंगणवाडी कर्मचारी आणि पर्यवेक्षकांनी (सुपरवायझर) "हे वरूनच असे आले आहे, यात आम्ही काय करणार?" अशा आशयाची उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पालकांचा संताप अधिकच अनावर झाला. मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराबाबत प्रशासकीय स्तरावर गांभीर्य नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. बी.डी.ओ. कडे चौकशीची मागणी या घटनेनंतर पालकांनी एकवटून लेखी तक्रार अर्ज तयार केला आहे. हा अर्ज अंगणवाडी प्रशासन आणि भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पालकांच्या प्रमुख मागण्या: * अंगणवाडीत पुरवल्या जाणाऱ्या अन्नाची सखोल चौकशी व्हावी. * निकृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. * भविष्यात मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची लेखी हमी मिळावी. > "अंगणवाडीत आमच्या लहान मुलांना पोषक आहार मिळेल अशी अपेक्षा असते, पण तिथे किडे असलेले अन्न दिले जात आहे. यावर विचारणा केली असता प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

Indian Crime News

Related Articles

Back to top button