नंदुरबार आगाराचा ‘ अंदा धुंदा कारभार हेड विनालाईट रात्री धावणाऱ्या बसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला.
नंदुरबार आगाराचा ' अंदा धुंदा कारभार विनालाईट धावणाऱ्या बसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला. नंदुरबार आगाराचा अजब-गजब आणि तितकाच संतापजनक कारभार समोर आला आहे. शनिमांडळ ते नंदुरबार रात्री रस्त्यावर नंदुरबार आगाराची एक बस (बस क्र. MH14 BT 1801 ) चक्क विनालाईट धावताना आढळून आली. ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या या 'अंधाऱ्या' बसमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती, ज्यामुळे प्रवाशांच्या आणि इतर वाहनधारकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमका प्रकार असा की मिळालेल्या माहितीनुसार, शनिमंडळ ते नंदुरबार मार्गावर काल रात्री ही बस धावत होती. विशेष म्हणजे, बसचे मुख्य दिवे (Headlights) बंद असतानाही चालक मोठ्या वेगाने बस चालवत होता. रस्त्यावरील इतर वाहनधारकांना समोरून बस येत असल्याचे लक्षात येत नव्हते. जर एखाद्या वाहनधारकाच्या हे वेळीच लक्षात आले नसते, तर भीषण अपघात होऊन मोठी जीवितहानी झाली असती. नागरिकांचा संताप या प्रकारामुळे रस्त्यावरील नागरिक आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "एकीकडे एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाचा दावा करते, तर दुसरीकडे अशा प्रकारे विनालाईट बस रस्त्यावर उतरवून प्रवाशांच्या जीवाशी खेळले जात आहे का?" असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. बस चालकाने अशा परिस्थितीत गाडी चालवून एक प्रकारे अपघाताला निमंत्रणच दिले आहे.