शहाद्याहून छत्रपती संभाजीनगर जाणारी बसला भीषण आग; ४८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले, सामान जळून खाक
शहाद्याहून छत्रपती संभाजीनगर जाणारी बसला भीषण आग; ४८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले, सामान जळून खाक शहादा आगारातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या लांब प्रवासासाठी jp कंपनीची करार नामाक एसटी बसला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. खुलताबाद जवळील पळसवाडी शिवारात ही घटना घडली असून, बसमधील सर्व ४८ प्रवासी सुखरूप असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. मात्र, या आगीत प्रवाशांचे लाखो रुपयांचे सामान आणि संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शहादा डेपोची ही बस मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरसाठी रवाना झाली होती. दुपारी ४:२० वाजेच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारातील 'हॉटेल आम्रपाली' समोर बस जेवणासाठी थांबवण्यात आली होती. बहुतांश प्रवासी खाली उतरून जेवण करत असतानाच, अचानक बसच्या लांबून आल्यामुळे टायर गरम झाले असल्यामुळे मागील टायरचा मोठा स्फोट झाला. चालक-वाहकाची तत्परता टायर फुटल्याचा आवाज ऐकताच बसचे चालक आणि वाहकांनी तातडीने गाडीच्या दिशेने धाव घेतली. बसमध्ये काही प्रवासी अजूनही बसलेले होते, त्यांना चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने खाली उतरवले. काही क्षणातच टायरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रवाशांचे सामान जळून खाक आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, प्रवाशांना त्यांचे सामान बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. प्रवाशांच्या बॅगा आणि इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. बसच्या टायर,सीट आणि डिझेल टाकीने पेट घेतल्यामुळे आगीने काही मिनिटांतच संपूर्ण बसचा कोळसा केला. प्रवाशांनी आपले डोळ्यादेखत सामान जळताना पाहून हळहळ व्यक्त केली आहे. मोठी दुर्घटना टळली सुदैवाने ही आग बस धावत असताना किंवा प्रवासी आत असताना लागली नाही, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. बसमधील ४८ ही प्रवासी सुरक्षित असून त्यांना इतर पर्यायी व्यवस्थेने पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहे.मात्र अशा लांब रूटला चालणाऱ्या गाड्या संबंधित JP कंपनीने त्यांचे टायर वेळेवर बदलणे गरजेचे आहे कारण ती प्रवासी बस आहे मला तू नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.