ब्रेकिंग न्यूज़

नंदुरबार जिल्ह्यातील तालुका शहादा येथे कहाटूळ यागावी 23 दिवसापासून बेपत्ता राणूबाई ईशी गावाजवळील शेतात मृत अवस्थेत सापळल्या.

कहाटुळ येथे हरवलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू; 23 दिवसांनंतर शेताच्या बांधावर मृतदेह आढळला, गावकऱ्यांमध्ये संताप..नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटुळ येथे हरवलेल्या महिलेचा राणूबाई ईशी वय 65 वर्ष यांचा मृतदेह तब्बल 23 दिवसांनंतर त्याच गावातील एका शेताच्या बांधावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे. मृत राणूबाई ईशी या आर पी आय पक्षाची शहादा तालुकातील माजी महिला अध्यक्ष होत्या यामुळे परिसरात एक सामाजिक कार्याने परिचित होत्या. सदर महिला हरवल्याची तक्रार 8 फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र तीन आठवड्यांनंतर तिचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच समाजातील बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे कहाटुळ व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रन ठेवण्यात येत आहे. नेमका घातपात आहे का अपघात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button