ब्रेकिंग न्यूज़

*शहादा बस स्थानकात प्रवाशांशी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपुत यांनी युवा सेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत यांचा संवाद *

*शहादा बस स्थानकात प्रवाशांशी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपुत यांनी युवा सेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत यांचा संवाद * शहादा आगारात वाहतूक नियंत्रक व प्रवासी यांच्याशी संपर्क साधत समस्या जाणून घेतल्या तसेच संपुर्ण बस स्थानकाची पाहणी केल्यानंतर वाहतूक नियंत्रकाकडे बस स्थानकातील विविध समस्या तात्काळ सोडविण्यात यावेतसेच योग्य सुविधा देण्यात यावी अशी मागणी केली. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैय्या रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे जिल्हा प्रमुख मोहितसिंग राजपुत,युवा सेना उप जिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, युवासेनेचे शहादा शहर प्रमुख सागर चौधरी युवा सेनेचे स्वप्निल पाटील, अर्जुन राजपुत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहादा येथील बसस्थानकावर प्रत्यक्ष भेट देत संपुर्ण बस स्थानकातील परिसरात स्वतः पाहणी सह प्रवाश्यांना विचारपूस करीत बस स्थानकातील संपुर्ण समस्यांची माहिती जाणून घेतली तसेच बस स्थानकातील हिरकणी कक्ष, सी.सी.टि.व्ही. कॅमेरे,स्वच्छता गृह, प्रवाशांकरिता असलेल्या आसनांची बैठक व्यवस्था, नादुरुस्त पंखे, स्थानकातील महिला सुरक्षा,बसेसची दुरावस्था, वेळेवर बसेस सोडणे, चालक हे बस चालवतांना मोबाईल बोलणे, प्रवाशांशी सौजन्याने वागणे,पिण्याच्या पाणी मिळत नसल्याबद्दल यासह विविध प्रकारच्या समस्या बाबतची माहिती वाहतूक नियंत्रक रफिक मिर्झा, वाहतुक नियंत्रक विजय धनगर, वरिष्ठ लिपीक शरीफ पिंजारी अकाऊंट उदय ठाकरे, यांना भेटून वरील सर्व समस्या निदर्शनास आणून देत वरील सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात यावे व योग्य ते उपाययोजना करून चांगली सुविधा पुरवण्यात यावी अशी मागणी केली आहे.तसेच महिला सुरक्षा बाबतीत विशेष दक्षात घेण्यात यावी व महिलेच्या सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जी होता काम नये असे सुचविले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपुत, उप जिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, सागर चौधरी यांच्या सह युवा सेनेचे गणेश माळी, कांतिलाल वळवी, शशिकांत बिरारे, कुंदन मोते, सिद्धांत ईशी, तेजस निकम, सुकलाल कोळी, जयेश निकम, कल्पेश डांगळे, यश पाटिल, प्रकाश बिरारे,, प्रशांत वेंदे, हितेंद वर्मा, कौस्तुभ मोरे व युवा सेनेचे युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button