ब्रेकिंग न्यूज़

शिरपूर शहर पोलिसांनी २१ तोळे सोन्यासह ५ आरोपींना घेतले ताब्यात.

*शिरपूर शहर पोलिसांनी २१ तोळे सोन्यासह ५ आरोपींना घेतले ताब्यात.* *शिरपूर:* सातारा येथील सोने व्यापारी कोमल परिहार यांच्याकडील २२ तोळे सोने ५ अज्ञात दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना दि. २७ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. दरोडेखोरांनी दरोडा टाकून विना नंबर प्लेट असलेली पांढऱ्या रंगाची स्विप्ट कारने साताऱ्याहून मध्यप्रदेशच्या दिशेने पळाले असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. यावरुन शिरपूर शहर पो.स्टे.चे पो उ नि संदिप दरवडे, राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मनोज महाजन,सचीन वाघ,भटु साळुंके, विजय पाटील यांच्यासोबत नाकाबंदी लावुन शोध घेतला परंतु अज्ञात आरोपी यांनी टोल नाका चुकवुन शिरपूर शहरातील रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांचा पाढलाग करुन अभिषेक सुरेंद्र शिकलबार (वय १९ रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, माध्यप्रदेश.) अंकुश जाट (वय १९ रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, माध्यप्रदेश.) अनुज रामाधर दिवाकर (वय १९ रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, माध्यप्रदेश.) पंकज केदार राठोड (वय १९ रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, माध्यप्रदेश.) अजय फौजदा राठोड (वय २१ रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, माध्यप्रदेश.) यांना ताब्याब घेऊन त्यांच्याकडील एकूण २१ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button