ब्रेकिंग न्यूज़

*धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; दारूची तस्करी ठरली तरुणांवर जीवघेणी.*

*धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; दारूची तस्करी ठरली तरुणांवर जीवघेणी.* *सुरत- धूळ राष्ट्रीय महामार्ग आंतरराज्यीय तस्करीचे केंद्र तर ठरत नाही?* धुळे : Dhule–सुरत महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर तब्बल पाच ते सहा वेळा पलटी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातात आकाश पाटील या दारू तस्करी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दूसरा तस्कर रोहित वाघ हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना विसरवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. विसरवाडी पोलिसांनी घटनेची गंभीरता धाव घेत पंचनामा केला. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातग्रस्त कार (क्रमांक GJ 26 AB 4424) मधून मद्याचे खोके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात ही कार दारूची तस्करी करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातावेळी वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने महामार्गावर वाहन चालवताना वेगमर्यादा पाळण्याचे आणि बेकायदेशीर वाहतूक टाळण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून, मद्य तस्करीच्या अँगलनेही चौकशी केली जात आहे. दरम्यान धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर आंतरराज्यीय सराईत तस्करांची टोळी तर कार्यान्वित झालेली नाही अशी शंका उपस्थित केली जाते आहे तसेच महामार्ग बेकायदेशीर दारू तस्करीचे केंद्र तर होत नाही याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करून योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा अश्या घटना पुन्हा घडणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. महामार्गावरील वेग आणि बेकायदेशीर कृत्ये जीवघेणी ठरू शकतात, याचे हे आणखी एक धक्कादायक उदाहरण ठरले आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button