ब्रेकिंग न्यूज़

शहादा शहर विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे निवेदन; नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्याकडे विविध मागण्या सादर

शहादा शहर विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे निवेदन; नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्याकडे विविध मागण्या सादर शहादा येथील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत दादा पाटील यांना शहर विकासासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार बांधण्यात यावे, तसेच शहादा शहराच्या पूर्व दिशेला नवीन स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना छत्री किंवा छत बांधून सुशोभीकरण करावे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहादा शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच शहरात वाढलेल्या मोकाट गोवंश व कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा, अशा विविध नागरिकहिताच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या निवेदनावर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्यासह पत्रकार ऋषभ अग्रवाल, सुपडू खेडकर, मनोज जैन, राजरत्न बिरारे, मनोज सोनवणे, अभय जैन, जगदीश पाटील, प्रवीण सैंदाणे, गुलाब सुतार, गोपाल कोळी, विजय महाले, हितेंद्र वर्मा, जगदीश ठाकरे, अंकुश लोहार, लव लोहार, स्वरूप लुंकड, ॲड. भोजेंद्र शिंदे, मुकेश इंगळे, राज बाशिंगे, निखिल चव्हाण, दिलीप पवार, किशन अहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहराच्या विकासाशी संबंधित या मागण्यांकडे नगरपालिकेने सकारात्मक दृष्टीने पाहून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.



Indian Crime News

Related Articles

Back to top button