ब्रेकिंग न्यूज़

शहादा येथील नवलपूर जवळ अल्टो कारचा भीषण अपघात

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नवलपुर जवळ,अल्टो कारचा भीषण अपघात, एका मुलीचा जागीच मृत्यू झाला असून त्यातील तीन जण गंभीर जखमी आहेत .सदर परिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे संत ठाकुरशिंगजी बाबा यांचे सत्संग कार्यक्रमास गेले असता रात्री आपली अल्टो कार MH 39 J 3735 याने आपल्या गावी म्हसावद येथे परत येत असताना सकाळी 4 वाजेच्या जवळपास नवलपुर सुसरी धारणाच्या पुलाच्या कडेला गाडी नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या डीवायडरला आढळली हा अपघात इतका भीषण होता की पूर्ण कुटुंबाला जबर मार लागल्यामुळे अती रक्त स्राव होत असल्याने त्यातील लहान मुलगी लक्ष्मी सोनवणे वय वर्ष 21 हिचा जागीच मृत्यू झाला व इतर परिवारातील सदस्यांना गाडी मालक संजय मच्छिंद्र सोनवणे त्याच्या पत्नी मनिषा सोनवणे एक मोठी मुलगी भटी सोनवणे यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णवाहिकेने हलवले आले असून चालक संजय मच्छिंद्र सोनवणे वय वर्ष 54 हे भूमी अभिलेख विभागामध्ये सर्वेक्षक म्हणून कार्यरत आहेत सदर घटनेची नोंद शहादा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button