चित्ररथ’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे रोवली


*‘चित्ररथ’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे रोवली*
सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार वनक्षेत्र शहादा यांच्यामार्फत कार्यक्षेत्र पाडळदा येथील इको क्लब पाडळदा, परिवरदा,कुढवाद, चिखली येथे शाळेत ‘चित्ररथ’ या विशेष पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक मुक्त परिसर, पाणी बचत, ऊर्जा बचत व LIFE कृती, कचरा व ई-कचरा व्यवस्थापन, निरोगी जीवनशैलीचा अवलंब, स्वच्छता मोहीम, जैवविविधता अभ्यास व संरक्षण तसेच पर्यावरणपूरक सण साजरे करणे या विषयांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना टेलिव्हिजनच्या माध्यमातून चलचित्र दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
*सदर ‘चित्ररथ’ कार्यक्रमात श्री. राहुल पाटील यांनी माहितीपर व प्रेरणादायी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.* कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. भूपेश तांबोळी, वनरक्षक, शहादा यांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेला व विद्यार्थ्यांना वन्यप्राणी व निसर्गरम्य चित्र असलेले पोस्टर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास एकूण प्रति शाळा 200 ते 250 विद्यार्थी तसेच पाडळदा क्षेत्रतील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारीवृंद उपस्थित होते
*हा कार्यक्रम डॉ. मकरंद गुजर, विभागीय वन अधिकारी, नंदुरबार, श्रीमती अपर्णा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, नंदुरबार तसेच श्री. रामकृष्ण लामगे, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण क्षेत्र शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला.*

Subscribe to my channel