Maharastra News : विद्यार्थी विज्ञान मंथन जिल्हास्तरीय परीक्षा मंडळाची कार्यशाळा संपन्न

रिपोर्टर पकाले भूपेन्द्र उमाकांत नंदुरबार महाराष्ट्र
विज्ञान मंथन जिल्हास्तरीय परीक्षा मंडळचे एक दिवसीय कार्यशाळा दि.१२सप्टेंबर रोजी डि.आर.हायस्कूल नंदुरबार, येथे आयोजित केले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नंदुरबार माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.प्रवीण अहिरे साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.भानुदास रोकडे साहेब ,तसेंच उपशिक्षणाधिकारी युनिष पठाण साहेब माध्यमिक शिक्षण कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक शिक्षक निरीक्षक श्री.भावेश सोनवणे साहेब ,श्री.लोहकर साहेब,श्री,राजेंद्र बागले साहेब प्रशांत पाटील सर डि.अर हायस्कूलचे चेअरमन श्री.नरेंद्र भाई श्राँप वि. वि.म.परीक्षाचे राज्य समन्वयक अमोल कुंभलकर सर ,जिल्हा समन्वयक दिनेश वाडेकर सर ,वाडीले सर ,मुख्याध्यापक अहिरराव सर उपमुख्याध्यापक मोडक सर पर्यवेक्षक खैरनार सर जिल्ह्यातील उपस्थित सर्व मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक व शिक्षिका कार्यशाळेसाठी उपस्थित होते
रोकडे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना विज्ञानाचे महत्व तसेच स्पर्धा परीक्षेचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले वि. वि.मंडळ चे राज्य समन्वयक अमोल सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कसे करावे हे जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांना p.p.T द्वारे मार्गदर्शन केले व तालुका निहाय समन्वयकांची नेमणूक केली. वाडेकर सरांनी सर्व उपस्थित शिक्षण विभागातील पदाधिकारी व शिक्षकांचे आभार व्यक्त केले डॉ. भूपेंद्र पाकळे