ब्रेकिंग न्यूज़

Maharashtra News : नितीन गडकरींच्या निवासस्थानाला बॉम्बने उडविण्याची धमकी सुरक्षा यंत्रणा सतर्क नागपूरमधील दोन्ही घरांची सुरक्षा वाढवली आरोपीला अटक

रिपोर्टर राहुल वी किंडरले नागपुर महाराष्ट्र

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडविण्याची धमकी रविवारी सकाळी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी तत्काळ पावले उचलत, नितीन गडकरींच्या दोन्ही निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दरम्यान, धमकीचा कॉल फेक कॉल असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली असून, या प्रकरणती एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपूर येथील जयप्रकाशनगर मेट्रो स्थानकाजवळील एत्रिको हाइट्स येथे वास्तव्यास आहेत, तर महाल परिसरातील त्यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण सुरू आहे. आज एका अज्ञाताने डायल 112 वर कॉल करून नितीन गडकरींचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. माहिती मिळताच राणा प्रतापनगर आणि कोतवाली पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून नितीन गडकरी यांच्या दोन्ही ठिकाणच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा फोन फेक कॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कोणतीही जोखीम पत्करण्यात न येता सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित कॉल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या घराची सुरक्षा आधीपासूनच चोख आहे, मात्र अशा प्रकारची धमकी मिळाल्यानंतर यामध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. हा प्रकार केवळ खळबळजनक नसून, सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जात आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा गंभीरतेने तपास केला जात आहे.

Indian Crime News

Indian Crime News

Related Articles

Back to top button