महाराष्ट्र

Maharashtra News ऊसेगाव येथे चालते सर्रास अवैध वाळु तस्करी

रिपोर्टर वहाब अली सैयद चंद्रपुर महाराष्ट्र

महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील नेरी जवळील ऊसेगाव गावालगत असलेल्या रेती घाटावर रात्रभर सर्रासपणे रेती तस्करी चालु असून या रेतीतस्करना उसेगाव ग्रामपंचायतीचे काही सद्स पदाधिकारी सहकार्य करीत आहेत असे आरोप गावातील नागरिकांनी केला आहे उसेगावाला लागून मोठी अशी उमा नदी आहे या नदीपत्राला सुंदर अशी बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती असल्याने रेतीतस्करचा डोळा नेहमीच या नदीवर असल्यामुळे रेतीतस्कर हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रोजसरार्स रेतीचा उपसा करीत आहेत अनेकदा याबाबत महसूल विभागाला गावकऱ्यांनी माहिती दिली परंतु कारवाई शून्य आहे याचाच फायदा रेती तस्कर घेत आहेत तसेच गावातील ग्रा प सदस्य व पदाधिकारी याबाबत कुठलीही कारवाई करीत नाही तसेच लक्ष देत नसल्याने गावातील नागरिकांनी यांचेच या रेतीतस्कराना मदत किंवा साथ तर नसावी अशी शंका उपस्थित केली असून आरोप केला आहे या बाबीला कारणही तसेच आहे की उसेगावात यापुर्वी गावातील नागरीका॓नी गावातच भररसत्यात रेती भरलेली वाहने अडकवली होती. मात्र ऊसेगाव ग्रामपंचात नी गावकर्याना सहकार्य न करता नुसती बघ्याची भुमीका घेतली होती . त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी या तस्करीत शामील असल्याचे नागरीकाकडुन बोलले जात आहे.

या तस्करी संदर्भात गावकरी या॓नी स्थानिक तलाठी, तहसील कार्यालय चिमुर या॓ना वारोवार तक्रारी केल्या मात्र कारवाई झीरो आहे.त्यामुळे ह्या रेती तस्करावर नेमका आशिर्वाद कुनाचा असा प्रश्न निर्माण झाला असुन रेती आहे तर पाणी आहे पाणी राहील तर आमच्या शेतात पीक घेऊ त्यामुळे या रेती तस्करावर तात्काळ कारवाई करा अशी आर्त हाक उसेगाव वाशीय नागरीका॓नी दीली आहे.तेव्हा महसूल विभागाने पथक तयार करून कारवाई करावी आणि रेतीतस्करांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिक करीत आहेत

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button