Maharashtra News हिवरखेड शहर मध्ये मोफत तीन दिवसीय शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न

रिपोर्टर अकबर खानकोला महाराष्ट्र
स्थानिक हिवरखेड शहर वार्ड क्रमांक ४ इस्लामपुरा मधील अंगणवाडी मध्ये समाजकार्याने झपाटलेल्या तरुण युवक,
शेख शाहरुख (लालाजी) यांनी पुन्हा एकदा तीन दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन केले होते.
यामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई माशिन योजना ,मुखमंत्री वयोश्री योजना,
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तसेच नवीन मतदान नोंदणी, यासारख्या योजनांचा समावेश होता. यामध्ये सर्व लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सर्व योजनांचा विनामूल्य अर्ज भरून देण्यात आले.त्याचबरोबर मतदान कार्ड अपडेट,आधार कार्ड अपडेट याप्रकारचे लोक उपयोगी कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले.
या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला. समाजसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते शाहरुख लाला नेहमीच सामाजिक सेवा करताना दिसत असतात.यापूर्वीही अशा शिबिराचे आयोजन ही त्यांची संकल्पनाच असते.

Subscribe to my channel