महाराष्ट्रराजनीति

Maharashtra News युवकांच्या साथीने ब्रह्मपुरीवर भाजपचा झेंडा फडकवू

माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन.

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र

मेंडकी येथील युवा वॉरियर मेळाव्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळेंचा निर्धार.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे दि.26 फेब्रुवारी रोजी ब्रह्मपुरी विधानसभेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरियर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मेंडकी येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या शाखा फलकाचे अनावरण केले. यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित येथील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात युवा वॉरियर भव्य मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, नामदेव डाहुले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, भाजपा ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे उपस्थित होते. युवकांच्या कमळाला दिलेल्या एका मताने आज देशाचे चित्र बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश विश्वगुरू पदाकडे वाटचाल करत आहे. याच युवकांच्या साथीने ब्रह्मपुरी वर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवू असा निर्धार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी केला. या सोबतच फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तयार करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळी युवकांना केले. खासदार अशोकभाऊ नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा लेखाझोका सादर केला. भाजपचे नेते, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी ब्रह्मपुरी मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे मदत करण्याची विनंती केली. तर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी युवकांना सोबत घेऊन ब्रह्मपुरीचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील युवा मोर्चा जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत मेंडकी येथील विनायक पाकमोडे, राहुल करंजेकार, फुले शिक्षण मंडळाचे संचालिका श्रीमती ढोले व पारिजात ढोले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेंडकीचे माजी सरपंच, युवा नेते यशवंत आंबोरकर यांनी केले. प्रास्ताविक भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव तनय देशकर यांनी केले तर आभार भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा. रामलाल दोनाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बालपांडे, सचिव माणिक पा. थेरकर, रश्मी पेशने, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष, माजी सभापती सौ वंदना शेंडे, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रेमलाल धोटे, आदिवासी आघाडीचे राजेशवर मगरे, माजी जि. प सदस्य काशिनाथ पा. थेरकर, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास वाकूडकर, माजी जि.प सदस्य रामू निहाटे, भाजपा जिल्हा कार्य. सदस्य ज्ञानेश्वर भोयर, तळोधी चे सरपंच अनिल तिजारे, ज्ञानेश्वर दिवटे, राजेश्वर शिवूरकर, चुमदेव जांभुळकर, मेंडकी भाजपचे अध्यक्ष राजेंद्र आंबोरकर, उपसरपंच उमेश घुले, निलजचे सरपंच हेमंत ठाकरे, मेंडकी युवा मोर्चाचे अध्यक्ष केशव आंबोरकर, माजी उपसभापती सुनिता ठवकर, महिला आघाडीच्या उर्मिला धोटे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपा व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलाल दोनाडकर, युवा नेते यशवंत आंबोरकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य जिल्हा लिलाराम राऊत, विधानसभेचे सोशल मीडिया संयोजक अविनाश मस्के, तालुका संयोजक धीरज पाल, भाजपा मेंडकीचे अध्यक्ष राजेंद्र आंबोरकर, केशव आंबोरकर, उपसरपंच सचिन गुरनुले यांच्या सह मेंडकीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक कार्य केले.

Indian Crime News

Indian Crime News

Related Articles

Back to top button