Maharashtra News सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न.

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे सिंदेवाही नगरात प्रथम आगमना निमित्य भव्य स्वागत करण्यात आले. सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही च्या विश्रामगृहात मा. राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी नितीन भाटारकर प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रशांत घुमे प्रदेशा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा गडचिरोली जिल्हा निरीक्षक, बेबीताई उईके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, हिराचंद्र बोरकुटे प्रदेशा उपाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल, प्रफुल महाजन ज्येष्ठ कार्यकर्ता, सलीम पठाण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, दामोधर नन्नावार विधानसभा अध्यक्ष ब्रह्मपुरी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल,बबलू शेख शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मुजीबउल्ला शेख तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक सेल, तुळशीदास खोब्रागडे,वहाबभाई सैय्यद आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले की लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा एकच असेल रोजगार सिंचन आणि शिक्षण हाच माझा संकल्प असणार आहे. आणि येणाऱ्या चिमूर गडचिरोली या लोकसभेकरिता मी या प्रश्नाच्या लढा देण्याकरिता निवडणूक लढणार आहे. असे कार्यकर्त्यांना संबोधित केले.
नवरगावचे भगवानजी पगाडे, सरडपारचे अंबादासजी कोसे, वासेरा-शिवणीचे गिरीश धात्रक, टेकरीचे राजेश्वर गायकवाड, लाडबरीचे राजू वानखेडे, जामसाळ्याचे चरणदास नैताम, अंतरगाव व इतर ठिकाणचे कार्यकर्ता उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी ओबीसी सेल, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल व सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ता गण उपस्थित होते. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले की कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम खा पठाण यांनी केले .
कार्यक्रमाचे संचालन वहाबभाई सैय्यद यांनी केले.
आभार प्रदर्शन बबलू शेख यांनी केले.


Subscribe to my channel