महाराष्ट्रराज्य

Maharashtra News वरोरा येथील रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना मिळणार वेळीच उपचार

आमदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र

रुग्णवाहिका आणि शववाहिकेमूळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असून रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळीच उपचारासाठी रुग्णालयात पोहचविण्याचे काम या माध्यमातून होईल असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा नगरपरीषदच्या 157 व्या स्थापना दिनानिमित्य कार्यक्रमात केले. वरोरा नगरपरीषदची स्थापना 17 मे 1867 रोजी झाली.स्थापना दिवसाचे औचित्य साधून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत उभारण्यात आलेल्या 75 फूट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे शुभ- हस्ते करण्यात आले.

नगरपरिषद स्थापना दिनी आमदारांचे 2021-22 चे स्थानिक आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेल्या शववाहिका व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार प्रतिभा धानोरकर यांचे शुभ हस्ते नगरपरीषद मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून नगर विकास विभाग,जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धे अंतर्गत नगरपरिषद च्या विजेता खेळाडूंच्या तसेच 2022-23 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मंजूर कर्जाचे धनादेशाचे महिला बचत गटांना धनादेश वितरित करण्यात आले.सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे,उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी,संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशेलवार,उपस्थित होते.तसेच नगरपरीषदचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक,व कर्मचारी वृंद सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश कथडे,व आभारप्रदर्शन निलेश सरागे यांनी केले

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button