शिरपूर शहर पोलिसांची ४ तासात कारवाई.*
*शिरपूर शहर पोलिसांची ४ तासात कारवाई.*

*किराणा दुकान चोरीप्रकरणी २ आरोपी जेरबंद, १४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत*
*शिरपूर* – शिरपूर शहरातील अंबर ट्रेडिंग किराणा दुकानात (दि.८ जुलै) रोजी रात्री १०:३० ते (९ जुलै) रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान झालेल्या चोरीचा गुन्हा शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या ४ तासात उघडकीस आणला.
फिर्यादी मनीष मोहनलाल अग्रवाल (रा. राजबोरी गल्ली, बालाजी मंदिर जवळ यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी १४,००० रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९६/२०२६ बीएनएस कलम ३०५ (अ) व ३३१ (३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल होता.
गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, प्रभारी अधिकारी, शिरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या पथकाने (१) मनीन खलील तेली व
(२) मकसूद अख्तर मेहतर दोन्ही (रा. लोहार गल्ली, शिरपूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १००, ५०, २०, १०, ५, २, १ रुपयांच्या दराच्या एकूण २०५९ भारतीय चलनी नोटा व नाणी असा एकूण १४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस अंमलदार
रविंद्र अवघडमल, अतुल पाटील, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन बाव, गोविंद कोळी, विनोद अखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार व मनोज महाजन यांचा समावेश होते



Subscribe to my channel