Maharashtra News नाशिक मुंबई हायवे रोठे इआरडी प्रा.लि कंपनीचे केमिकल मिश्र पाणी दारणा नदीपात्रात वन्यजीवास धोका पर्यावरणाची हानी

रिपोर्टर शशिकांत नासिक महाराष्ट्र
नाशिक इंडियन क्राईम न्यूज रिपोर्टर शशिकांत भालेराव नाशिक महाराष्ट्र ता.2/07/2026 नाशिक मुंबई हायवे गोंदे रोड वरील रोठे इआरडी प्रा लि कंपनी ने केमिकल मिश्रीत दुषित पाणी दारणा नदी पात्रात सोडून नदीचे पाणी दुषित केल्याने नदीतील मासे मरून पडत आहे तसेच ह्या पाण्याचा उपयोग आजू बाजूचे शेतकरी शेतीसाठी तसेच वन्यजीव प्राणी पाणी पिण्यासाठी नदीपात्रा जवळ येत असता रोठे कंपनी ने नदी पात्रात केमिकलचे दुषित मिश्र पाणी सोडल्याने आजुबाजूच्या परिसरात .दुर्गंधीचा उग्रवास येतो.तसेच शेतक यांच्या जिवितास धोका निर्माण झालेला असून पर्यावरणाची हानी सुद्धा होत आहे ह्या बातमीची महाराष्ट्र .शासनाने त्वरीत दखल घेऊन याकडे लक्ष घालुन रोठे इआरडी प्रा.लि कंपनीला नोटीस काढून कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी गोंदे दुमाला गावातील ग्रामस्थाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते बंटी पगारे वृक्षप्रेमी यांनी केलेली आहे तसेच या प्रकाचे निवेदन ईगतपुरी तहसिलदार,वारिष्ठ पो.नि वाडीव-हे सरपंच, ग्रामसेवक गोंदे दुमाला यांना या घटनेची त्वरीत चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. अशा प्रकारचे पत्रक देण्यात आले.




Subscribe to my channel