ब्रेकिंग न्यूज़

शहादा शहरात पोलीस विभागातर्फे मोफत हेल्मेटचे वाटप * बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

*शहादा शहरात पोलीस विभागातर्फे मोफत हेल्मेटचे वाटप * बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई* शहादा शहरात पोलीस विभागातर्फे मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकी चालकांसाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात मोफत हेल्मेट वाटप करण्याचा उपक्रम राबविला जात आहेत आज शहादा शहरात पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या हस्ते स्टेट बँक चौक परिसरात मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी वाहतूक पोलीस धनंजय पवार उमेश चौधरी सचिन पाटील सचिन गौंड युसूफ गावित उपस्थित होते यावेळी वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली दरम्यान आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन वाहन दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा व अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालविण्यास देऊ नये वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी केले आहे.



 

Indian Crime News

Related Articles

Back to top button