Maharashtraब्रेकिंग न्यूज़
वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन शिबीर संपन्न



वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन शिबीर संपन्न
वल्लभ विद्यामंदिर पाडळदा ता शहादा येथे १४ जानेवारी व्यवसाय दिनानिमित्त व्यवसाय
मार्गदर्शन व समुपदेशन सप्ताह अंतर्गत शिबीर आयोजित करण्यात आले.
यात विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय कौशल्य
विषयी माहिती देण्यात आली. ज्ञान आणि
कौशल्य वापरुन व्यवसाय निवड करणे व व्यवसाय संधी शोधणे . उद्योग व्यवसाय
प्रकार व त्यासाठी लागणारे आवश्यक घटक
तसेच संवाद,संभाषण,तंत्रज्ञानाचा वापर,विपनन आधी कौशल्यांची माहिती देण्यात आली. तसेच दहावी व बारावी नंतरच्या करिअरच्या संधी व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या वाटा या बाबत मार्गदर्शन
तसेच समुपदेशन संबंधी माहिती देण्यात आली. शाळेतील शिक्षक डाॅ.भूपेंद्र पाकळे ,
अंबालाल चौधरी सर होते.यावेळी सर्व शिक्षकक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Subscribe to my channel