ब्रेकिंग न्यूज़
Maharastra News :वल्लभ विद्या मंदिर पाडळदे तालुका शहादा येथील 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने वसंतराव

रिपोर्टर पकाले भूपेन्द्र उमाकांत नंदुरबार महाराष्ट्र
विद्या मंदिर पाडळदे तालुका शहादा येथील 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने वसंतराव नाईक हायस्कूल शहादा येथील मैदानात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात अंबापुर संघाचा दणदणीत पराभव करून. विजय मिळवला,राणी पावरा,अनिता पावरा,कावली पावरा, ,समिक्षा पावरा यांनी प्रतिस्पर्धी संघाला आपली खेळाची चुणूक दाखवून संघाला विजयी केले.विजयी संघाची जिल्हास्तरावर निवड झाली. संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील व्हाइस चेअरमन विजय पाटील सचिव डॉ.विलास पटेल तसेच सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक अंबालाल चौधरी पर्यवेक्षक गणेश पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.खेळाडुंना चतुर पाटील व राजू वसावे यांचे मार्गदर्शन लाभले