Maharashtra News विकासाचा गाडा हाकनाऱ्यांकडून कर्तव्यात कुचराई नको-आमदार विजय वडेट्टीवार

रिपोर्टर वहाब अली सैयद चंद्रपुर महाराष्ट्र
पंचायत समिती विभागाची आहे. मात्र सदोष कार्य प्रणाली व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दिरंगाई धोरण यामुळे ग्रामीण नागरिकांना याचा प्रचंड ना हा त्रास सहन करावा लागत असून अनेकांची कामे रिंग आलेली असल्याची वस्तुस्थिती आज आमसभेत निदर्शनास आली. विकासाचा गाडा हाकणाऱ्यांकडून कर्तव्यात तीळ मात्रही कुचराई नको अशी तंबी देत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले. तर आयोजित आमसभेत पशुसंवर्धन व पंचायत विभागावर नागरिकांनी प्रचंड ताशेरे ओढले
आज सिंदेवाही येथील पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती सिंदेवाही ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आयोजित सभेस अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, ठाणेदार तुषार चव्हाण, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोंधे, सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत चे नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प. स. सदस्य राहुल पोरड्डीवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राहुल बोडणे, सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष सचिन नाडमवार,अरुण भाऊ कोलते, सुशांतभाऊ बोडणे, प्रामुख्याने उपस्थित होते आयोजित वार्षिक साधारण सभेत मागील वर्षी सन 2021- 22 या आर्थिक वर्षाचा कार्य अहवाल वाचन करण्यात आला सोबतच सन 2022 -23 चा अहवाल सादर करताच विविध विभागाच्या कार्यप्रणालीवर सदोषतेचा थपका ठेवत नागरिकांनी आमसभेत तक्रारीचे वादळ निर्माण केले. यावर सभाध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी कृषी विभाग व विद्युत विभागच्या कार्यप्रणाली बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरून तसेच पंचायत विभागाच्या विकास कामा संदर्भातील अहवाला बाबत दिशाभूल करणारे अहवालपत्रक सादर केल्याने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सोबतच नागरिकांच्या समस्या आठवडाभरात सोडवा अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील दिली. ग्रामीण भागात विकासाचा दुवा म्हणून पंचायत समितीची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. ही जबाबदारी पेलणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने ग्रामीण नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वतोपरी प्रयत्नातून विकासाचा गाडा हाकलत ग्रामीण भागाचा विकास साधावा असे होत नसल्यास कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करा अशा प्रकार शब्दात माजी मंत्री आमदार वडेट्टीवर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले. याप्रसंगी सिंदेवाही तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारी वृंद व वृत्तपत्रातील प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते
Subscribe to my channel