ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रराज्यस्वास्थ्य

Maharashtra News सिंदेवाही तालुक्यातील अनेक कार्यालयात स्वच्छतेचा विसर

रिपोर्टर वहाबअली सैय्यद,चंद्रपूर,महाराष्ट्र

सिंदेवाही तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरातील तहसील प्रशासकीय कार्यालय परिसरातील परिचित विभाग कक्षात स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. तालुक्यातील नागरिकांचे नेहमीच या विभागात कार्यालयीन कामांची रोज वर्दळ असते.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या तहसील कार्यालय परिसरातील परिचित विभागात स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कार्यालयामध्ये नागरिकांची तसेच बिनबुडाचे नेहमीच वर्दळ असते. नेटवर्क , लिंक व विद्युत पुरवठा नसेल तर ताटकळत बसतात.शासकीय काम व निमशासकीय कामाकरता प्रशासकीय कार्यालयाच्या वेळेतच नागरिक येत असतात. तहसील कार्यालयातील याच एका विभागीय कक्षामध्ये स्वच्छता विसर पडलेला आहे. नागरिक नेहमीच येत असलेल्या ठिकाणी या केंद्रावर स्वच्छता नसल्याने प्रशासकीय कार्यालयात भिंती चे जवळ चहा पिलेले कप व इतर सामग्री, कचरा दिसून आलेला आहे.
कार्यालयातील प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे कक्ष नीटनेटके व सुसज्ज असतात. तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा स्वच्छ व उपयोगी कार्यालयात मिळत नसल्याने व स्वच्छतेचा विसर पडलेला दिसून येत आहे . तालुका तहसील कार्यालय मध्ये नेहमीच दर सोमवारला नागरिकांची गर्दी कार्यालयात कार्यालयीन कामाकरीता वाढलेली असते. कार्यालयात अधिकारी आहेत काय, आपले कामे होतील काय, याकडे आवर्जून लक्ष देऊन परिसरात कामाचे रुपात चकरा मारीत असतात. कार्यालय परिसरातील कक्षात स्वच्छ्ता असावी अशी मागणी आहे

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button