Maharashtra News रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्र, निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेमधील दुरुस्ती गुरुवारी करण्यात येणार आहे.

रिपोर्टर गणेश गजानन प्रधान पुणे महाराष्ट्र
त्यामुळे गुरुवारी सायंकाळी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे. रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रात विद्युत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सेक्टर 23 निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहे. तसेच शरीरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार (दि १५) पिंपरी चिंचवड ला सकाळी होणारा पाणीपुरवठा नियमित वेळेत होईल. मात्र सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे (दि.१६)शुक्रवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान महानगरपालिकेने केले.



Subscribe to my channel