Maharashtra News लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी येथील विदयार्थी रोहीत दोड जिल्हयात प्रथम

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र
महाराष्ट्र उच्च माध्यमीक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला या परीक्षेत लोकमान्य टिळक उच्च माध्यमीक विदयालय, ब्रम्हपुरी येथील कला शाखेतील विदयार्थी रोहीत वसंतराव दोड हा (91.83 %) गुण घेऊन चंद्रपूर जिल्हयातून कला शाखेत प्रथम आला आहे. उच्च माध्यमीक विदयालयातील विज्ञान शाखेचा निकाल 96.66 टक्के तर कला शाखेचा निकाल 90.41 टक्के लागला. रोहीतने आपल्या यशाचे श्रेय त्याची आई कल्पना दोड , कुटुंबीय, प्राध्यापक वर्ग , अधीकारी वर्ग तसेच संपुर्ण शाळा परीवाराला दिले आहे. रोहीतच्या या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्री वसंतराव भुसारी होते तर संथेचे सचिव प्रा. श्री सतीश शीनखेडे, संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य श्री विलास धोंगडे सर, उपप्राचार्य श्री रवि पेशटटीवार सर, पर्यवेक्षिका सौ प्राजक्ता चिंचाळकर मॅडम, शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी रोहीतचे अभीनंदन केले. व पुढील शैक्षणीक वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत !