Maharashtra News राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मा. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हॉटेलस व रेस्टॉरंटची विशेष तपासणी मोहीम .

रिपोर्टर शशिकांत नासिक महाराष्ट्र
नाशिक दि.1 जुलै 2026 ते 2 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी मोहीमे अंतर्गत नाशिक विभागामध्ये हॉटेल रेस्टॉरंट खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात आली या कालावधीत तपासणी दरम्यान अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायद्यांतील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात आली या तपासणी मध्ये स्वयंपाक घरात अस्वच्छता निकृष्ट दर्जाचे शीतकरण यंत्र उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न कार्यरत कर्मचाऱ्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही तसेच ग्राहकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी यंत्रणा नसणे अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे विविध नियम व विधि नियमांचे उल्लंगन या कारणां कारणांमुळे
1) हॉटेल ग्रीन वॉल जत्रा लिंकरोड पंचवटी नाशिक 2) राधिका द्वारका नाशिक 3) क्राऊन पॅलेस पेठ रोड पंचवटी, नाशिक 3) त्रिमुर्ती अंजठा रोड एमआयडीसी जळगांव.4) जाधव रेस्टॉरंट नंदुरबार 5) लक्ष्मी हॉटेल सिन्नर नाशिक 6)हॉटेल भानु जळगांव इत्यादी हॉटेल व रेस्टॉरंट वर अस्वच्छता निकृष्ट दर्जाचे अन्न तसेच हॉटेल रेस्टॉरंट आस्थापनाचा गलथान पणाचा कारभार आढळून आल्यामुळे हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले.अन्न व सुरक्षा औषध व प्रशासनाचे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागात तपासणी मोहिमेंतर्गत सहाय्यक आयुक्त मंगेश माने यांनी नागरिकांची अन्न व सुरक्षा यांना प्रथम सर्वोच्च प्राधान्य देऊन जर हॉटेल रेस्टॉरंट मिठाईचे दुकाने या व्यवसायिकांनी नागरिकांच्या अन्न व सुरक्षा मध्ये हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.




Subscribe to my channel