ब्रेकिंग न्यूज़

शहादा शहरात पेट्रोल टंचाईची अफवा; नागरिकांची पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली

शहादा शहरात पेट्रोल टंचाईची अफवा; नागरिकांची पेट्रोल

पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली.

शहादा (प्रतिनिधी):

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात गेल्या काही तासांपासून “पेट्रोल-डिझेलचा साठा संपणार असून पुढे मिळणार नाही” अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. या अफवेमुळे धास्तावलेल्या नागरिकांनी सोमवारी, २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपासून शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली असून, आपली वाहने ‘फुल’ करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नेमकी स्थिती काय?

शहरातील आर.सी. पेट्रोल पंप, स्वस्तिक पेट्रोल पंप आणि दोंडाईचा बायपासवरील रिलायन्स पेट्रोल पंप या तसेच तिखोरा असे खेड्यावरील देखील जवळ जवळ सर्वेच पंपावर ठिकाणी नागरिकांची तुफान गर्दी दिसून आली. अफवेमुळे सर्वच जण एकाच वेळी पंपावर धाव घेतल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या घबराटीच्या वातावरणात पेट्रोल पंप मालकांनी नेहमीपेक्षा अधिक कर्मचारी लावून वाटप व्यवस्था सुरळीत ठेवली आहे व त्यांनी स्पष्ट केले आहे की, शहरात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

पंप मालकांची प्रतिक्रिया आणि सत्य परिस्थिती:

घटनेची गांभीर्याने दखल घेत काही पंपच्या मालकांशी संपर्क साधला असता त्यांनी खालील माहिती दिली:

 * आर.सी. आणि स्वस्तिक पंप: मनमाड ऑइल डेपोतून प्रत्येकी १२,००० लिटर क्षमतेचे टँकर सायंकाळीच दाखल झाले असून दोन्ही पंपांवर पेट्रोलचा नवा साठा भरण्यात आला आहे.

 * रिलायन्स पंप (बायपास): या पंपावर आधीच पुरेसा साठा उपलब्ध आहे.

 * साठा संपलेले पंप: केवळ ‘मनीष पेट्रोल पंप’ आणि कल्याणी डेअरी जवळील एक पंप सध्या बंद आहे. हे त्या पंपांचे वैयक्तिक तांत्रिक कारण किंवा नियोजित टँकर येण्यास झालेला उशीर असू शकतो.

 * पुढील पुरवठा: मनमाड ऑइल डेपोशी संपर्क झाला असून, पुढील टँकरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

> “आमच्याकडे पेट्रोल उपलब्ध असताना आम्ही ग्राहकांना नाही म्हणू शकत नाही. लोक गरजेपेक्षा जास्त साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.”

 पेट्रोल पंप मालक, शहादा येथील

नागरिकांना आवाहन केले की

केवळ अफवेला बळी पडून नागरिक मध्यरात्रीपर्यंत गर्दी करण्याची शक्यता आहे. सध्या शहराच्या सभोवतालच्या बहुतांश पंपांवर त्यांच्या क्षमतेनुसार साठा उपलब्ध आहे. त्यामुळे विनाकारण रांगा लावून गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून आणि पंप चालकांकडून करण्यात येत आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button