ब्रेकिंग न्यूज़

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा रोडवरील डामरखेडा जवळील गोमाई नदीच्या पुलावर वाहतूक कोंडी

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा रोडवरील डामरखेडा जवळील गोमाई नदीच्या पुलावर वाहतूक कोंडी. शहादा ते प्रकाश हा रोड रहदरीचा व अत्यंत महत्त्वाच्या असून गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि पोलीस प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्रस्त झालेले वाहनधारक आता थेट नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. ​गोमती नदीवरील पुलाची अवस्था बिकट झाली असून, वाढत्या वाहतुकीचा ताण या पुलाला पेलवत नाहीये. पुलावर पडलेले खड्डे आणि अरुंद रस्ता यामुळे तासनतास वाहनांच्या रांगा लागत आहेत. विशेषतः अवजड वाहनांमुळे ही कोंडी अधिकच जटील होते. मात्र, या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी तैनात नसल्याचे दिसून येत आहे.​नदीपात्र बनला 'पर्यायी मार्ग' ​पुलावरील कोंडीत अडकून पडण्यापेक्षा वेळ वाचवण्यासाठी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक चक्क नदीपात्रातून आपली वाहने नेत आहेत. नदीत पाणी असताना किंवा चिखल असतानाही अशा प्रकारे वाहन चालवणे अत्यंत धोकेदायक ठरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. ​प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' मौन? ​MSRDC चे दुर्लक्ष: पुलाची डागडुजी किंवा पर्यायी पुलाचे नियोजन करण्यात हे विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.​पोलीस प्रशासनाचा ढिसाळपणा: वाहतूक नियोजन कागदावरच मर्यादित राहिल्याने सर्वसामान्य वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ​नागरिकांची प्रतिक्रिया, "तासनतास पुलावर अडकून पडल्यामुळे आमचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, पण मानसिक त्रासही सहन करावा लागतोय. प्रशासनाने तात्काळ लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल." ​प्रशासनाने आता तरी जागे होऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहात का? असा संतप्त सवाल नंदुरबार वासिया विचारत आहेत.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button