Maharashtra कु-हेगांव दिया धोंगडे अल्पवयीन मुलीच्या सखोल जलद तपासाच्या

इंडियन क्राईम न्यूज शशिकांत भालेराव नाशिक महाराष्ट्र
दि.26/03/2026 रोजी ता. ईगतपुरी वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुरेगाव गावांमधील दिया योगेश धोंगडे वय 15 वर्षे शिक्षण 10 वी ही माझी अल्पवयीन मुलगी पहाटेच्या सुमारास मी भाजीपाला विक्रीसाठी घोटी मार्केट मध्ये गेलो असला माझी पत्नी नामे मीना हीने मला कॉल केला आणि सांगितले की आपली मोठी मुलगी दिया ही मला घरात झोपलेली दिसत नाही तिचा संपूर्ण घरा शोध घेतला परंतु ती मिळालीच नाही यामुळे मी घोटी बाजारातून घरी आलो व आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईक मंडळींकडे शोध घेतला असता ती कुठेच आढळून आली नाही यामुळे माझी खात्री झाली की आदेश जीवन चोथे राहणार वाडीव-हे याने माझ्या मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिचे अज्ञात कारणांसाठी माझ्या ताब्यातून फुस लावून अपहरण केलेले आहे. या घटनेला दोन महिने पूर्ण होऊन गेले असता आम्ही घरातील कुटुंब वाडीव-हे पोलीस स्टेशन मध्ये सदरच्या घडलेल्या घटनेचा तपास कुठपर्यंत चालू आहे याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता तेथील अधिकारी वर्ग आम्हाला उडवा उडवी चे उत्तर देऊन घरी पाठवून देतात यामुळे माझ्या मनात या अधिकाऱ्यांबद्दल संशय निर्माण झाला म्हणून आमचे कुटुंबांनी भगून नगर पालिकेचे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अजय वाहने आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या मार्फत आज दिनांक18/05/2026 रोजी नाशिकI पोलीस ग्रामीण अधीक्षक यांना या घटनेची जलद गतीने सखोल तपास करून आम्हाला आमची मुलगी परत मिळावी यासाठी निवेदन दिले असता अप्पर पोलीस उपअधीक्षक ग्रामीण मिरखेलकर यांनी या घटनेचा तपास हा स्पेशल गुप्तचर विभाग यांच्याकडून तत्काळ जलद गतीने करण्याचे आश्वासन दिले असता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी पत्रकारांना माहिती दिली की मराठा समाजातील दिया योगेश धोंगडे हीअल्पवयीन मुलीचे गेली दोन महिने झाली असून फिर्यादीने वाडीव-हे पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवून सुद्धा एका मराठा समाजाच्या कुटूंबाची येथील इतर राजकीय पक्ष दखल घेत नाही आणि याच मराठा समाजाच्या लोकांमुळे सत्तेत राजकारण करत असतात परंतु या घटनेची एकाही पक्षाने आजपर्यंत दखल घेतली नाही आमचा पक्षतर राजकारणात लहान आहे परंतु आमचा नेता हा श्रध्देय अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे नातु भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर घराण्यातील असल्याने ते सर्व समाजातील कुटंबाची समस्या सोडविण्यासाठी कायदयाच्या तसेच आंदोलनाच्या माध्यमाने लढा देण्यासाठी पुढे असतात त्यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्यात सतत सर्व समाजातील घटक व वंचितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करते.’जर सदरच्या घटनेचा जलद गतीने तपास वाडीव-हे तसेच नाशिक पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी लावला नाही तर येत्या 24 मे 2026 ला वंचित बहुजन आघाडी वाडीव-हे पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केल्या शिवाय गप्प राहणार नाही. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांनी सुद्धा वाडीव-हे पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी महाजन यांना प्रसिद्धी माध्यमां द्वारे इशारा देण्यात येतो की, धोंगडे कुटुंबातील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तात्काळ जलदरीत्या तपास केला नाही तर जिल्ह्यातील सर्व महिलांना घेऊन वाडीव-हे पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केल्या शिवाय शांत बसणार नाही. यात जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास सर्वस्वी जबाबदार वाडीव-हे पोलीस स्टेशन राहील. असे सांगितले.
वृत्तसंकलन नाशिक.




Subscribe to my channel